Ganpati.TV Contest 2021 Pre-Register

आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीसाठी 10 साध्या कल्पना – भाग 2 (5 कल्पना) + 2 कल्पना बोनसगेल्या वेळी आम्ही आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीसाठी 5 कल्पना शेअर केल्या होत्या, आशा करतो की सगळ्यांना त्या आवडल्या. खरंच बऱ्याच जणांनी त्या पाहिल्या आहेत. आम्ही आता इतर 5 कल्पना शेअर करत आहोत ज्या नक्कीच सर्वांना मदतरूप आणि उपयुक्त ठरतील.

या कल्पना इको-फ्रेंडली (पर्यावरण स्नेही) पर्यायांकडे लक्ष केंद्रित करतात जेणेकरून जागतिक तापमानवाढ कमी करण्याच्या दिशेने आपल्याला पुढाकार घेण्यास मदत होईल.

Ganpati Decoration Ideas Eco Friendly Ganpati Decorations

पुन्हा एकदा या सजावटी तुम्ही सहजरीत्या, कमी खर्चात आणि कमी वेळात करू शकता ज्यामुळे तुमची क्रिएटिविटी दाखविण्यास तुम्हाला वाव मिळेल.

6. ताज्या फुलांनी दररोज घरातील गणपतीची सजावट:

तुमच्या जवळपास ताज्या फुलांचा बाजार आहे का? होय असेल, तर तुम्ही फुलांचा भरपूर प्रकारे उपयोग करू शकता. फुले केवळ त्या जागेला बहुरंगी बनवत नाहीत तर त्याला एक नैसर्गिक सौंदर्य पण जोडतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्याच्या गोड सुवास छान ताजेपणा आणतो आणि सणाला खरे रूप देतो. सजावटीचा ताजेपणा राखण्यासाठी तुम्ही दररोज सकाळी फुले बदलू शकता. तुम्ही या फुलांचा वापर गणपतीच्या मूर्तीच्या भोवताल सजावटीसाठी करू शकता. विविध रंग आणि प्रकारच्या फुलांचा वापर करून वेगवेगळे डिझाईन्स तयार करता येऊ शकतात.

तुम्हाला सहज फुले मिळत नसतील तर काळजी करू नका. अशी अनेक स्थानिक दुकाने असतात जिथे नैसर्गिक फुलांसारखीच कृत्रिम फुले मिळतात. जरी ती फुले थोडीशी महाग असली तरी, थोड्याफार प्रमाणात ती खऱ्या फुलांसारखीच दिसतात.

Ganpati Decoration Ideas Fresh Flower Market Ganpati Decorations

Ganpati Decoration Ideas Fresh Flower Ganpati Decoration

7. उपलब्ध स्कार्फ, ओढणी, चुनरी व इतर रंगीत कपड्यांचे तुकड़े वापरा:

सहसा आपल्याकडे नेहमी काही रंगीत कपड्यांचे टुकड़े असतात जे आपण सजावटीसाठी वापरू शकतो. जर कोणतेही महिलांचे कपडे घरी उपलब्ध असतील किंवा मित्र परिवाराकडून ते उसने घेता येत असतील तर आपण त्यातले छान आणि रंगीत कपडे वापरू शकतो.

हे एकतर रंगीत स्कार्फ, ओढणी, चुनरी किंवा तुमच्या सजावटीच्या थीमशी जुळते कोणतेही इतर कापड असू शकते. तुम्ही नेहमीच उपलब्ध कपड्यांना आपआपसात मिसळून पाहू शकता की ते कसे दिसतात. लक्षात ठेवा की तुम्हाला त्या सोबत अजून काही सजावटीचे साहित्य जसे फुले, दिवे किंवा अगदी रीबंस पण लागतील ज्यामुळे तुम्ही सजावटीला पूर्ण रूप देऊ शकता.

Ganpati Decoration Ideas Colorful DupattasGanpati Decoration Ideas Colorful Dupattas And Chunris

Ganpati Decoration Ideas Colorful Dupattas Chunri Ganpati Decoration

8. रंग आणि ताजी फुले वापरून रंगबेरंगी रांगोळी डिझाइन:

रांगोळी ही भारतीय सणांमधील एक अविभाज्य भाग आहे. रांगोळी मुळे आजूबाजूचा परिसर रंगीत होतो आणि सणाचे वातावरण निर्माण होते. अनेक जण सजावटीचा भाग म्हणून सुंदर रांगोळी काढतात. गणेश चतुर्थीशी संबंधित अनेक डिझाईन्स केले जाऊ शकतात. तुम्ही त्यात तरबेज असणे आवश्यक नाही, भिंती किंवा दरवाज्या जवळ काढलेली अगदी सोपी रचना सुद्धा खोलीला शोभा आणते आणि तुमच्या जवळील व्यक्ति कायम त्याची प्रशंसाच करतील.

रांगोळीचे विविध रंग असतात, जे बाजारात उपलब्ध असल्यास तुम्ही सहज वापरू शकता नाहीतर गेल्या वर्षीच्या दिवाळीतील काही रंग उरलेले असतील तर पाहावे. तुम्ही शक्य असल्यास रांगोळी डिझाइनसाठी दररोज ताजी फुले वापरू शकता. एका रंगीत खडूने डिज़ाइन रेखचित्रित करून घ्यावे आणि फक्त दररोज त्यावर ताजी फुले भरावीत. त्यामुळे खरोखर आसपासच्या गोष्टी ताज्या आणि सुंदर दिसायला लागतील.

Ganpati Decoration Ideas Colorful Rangoli DesignsGanpati Decoration Ideas Flowers Rangoli

Ganpati Decoration Ideas Colorful RangoliGanpati Decoration Ideas Colorful Rangoli Colors

9. इलेक्ट्रिक दिव्यांची माळ आणि दिवे:

भारतीय उत्सव दिव्यांशिवाय अपूर्ण आहेत. दिवे हे फ़क्त सजावट करत नसून, भोवतालचा परिसर प्रकाशित करून सुंदर बनवतात. तुमच्या वापरासाठी विविध प्रकारचे दिवे उपलब्ध असतात. ते माळा, हार, फ्लॅश लाइट्स इ. प्रकारात मिळतात. तुम्ही मागच्या वर्षी दिवाळीत दिव्यांची माळ विकत घेतली होती का? अरे व्वा, घेतली असेल तर तिचा वापर का करु नये? काढून पहा की ती तुमच्या सजावटीशी जुळते आहे का. पण काळजी घ्या कि तुम्ही दिव्यांचा जास्त वापर करत नाही आहात, नाहीतर ते दिवाळी सारखे दिसेल आणि आपल्याला गणपतीच्या सजवाटीच्या थीम प्रमाणे सजावट करायची आहे.

तुम्ही दिव्यांचा वापर सजावटीसाठी करू शकता आणि त्यांना छान फूलांमधे ठेवा ज्यामुळे तुमच्या सजावट किंवा रांगोळीला शोभा येईल.

Ganpati Decoration Ideas Electric Lightings GarlandsGanpati Decoration Ideas Diyas Flower Rangoli

10. इको-फ्रेंडली (पर्यावरण स्नेही) सजावटीचे साहित्य:

जागतिक तापमान वाढत असल्याने, प्रत्येकाने इको-फ्रेंडली (पर्यावरण स्नेही) गणपती सजावट करण्यासाठी चांगले पर्याय शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे फ़क्त सजावटीला सौंदर्यच देत नाहीत तर पुनर्प्रक्रिया न करता येणारे किंवा वातावरण व निसर्गाला हानी न करणारे असावेत.
लक्ष असू द्या की वापरल्या जाणाऱ्या गोष्टी स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असतात.

Ganpati Decoration Ideas Eco Friendly Decorations

11. चमकदार सजावटीच्या माळा:

तुम्ही योग्य प्रकाशयोजना केली असेल तर चमकदार सजावटीचे साहित्य वापरून तुम्ही त्याला अजून रंगीत बनवू शकता. ज्या दुकानात सजावटीचे साहित्य मिळते तिथे हे सहज मिळतात.

तुम्ही गेल्या ख्रिसमससाठी सजावटीचे साहित्य खरेदी केले होते का? छान, बघा की त्यातले काही तुम्ही वापरू शकता का, मला खात्री आहे की तुम्ही निर्मितिक्षम असाल तर त्यातले अधिकाधिक साहित्य तुम्ही वापरू शकाल. पुढच्या सणासाठी पण तुम्ही ह्याचा वापर करू शकता.

Ganpati Decoration Ideas Glittered Decorative Ganlands

12. शो-केस किंवा कपाटातील सजावटीच्या वस्तू:

बऱ्याच वेळा असे असते की तुम्ही घरातील अनेक वस्तू सजावटीसाठी वापरू शकता पण त्या वस्तूंबद्दल तुम्ही विसरलेले असता किंवा तुम्हाला कळत नसते की त्यांचा वापर कसा करवा.

तुमच्या कड़े अशी एखादी वस्तू आहे का जी बराच काळ शो-केस किंवा कपाटात ठेवलेली आहे? एकदा बघा की तुम्ही ती/त्या वस्तू वापरू शकता का.
सहसा घरात बऱ्याच वस्तू असतात जशी फुलदाणी किंवा टांगलेली कुंड़ी जी ताज़ी फुले ठेवायला वापरता येते.
कोणतीही विशिष्ट प्रदर्शनार्थ वस्तू तुम्ही चिकटवून, रीबंस लावून वापरू शकता किंवा चमकदार सजावटीच्या माळा, फुलांच्या माळा लावून वापरू शकता. हा फक्त एक सहज पर्याय आहे जो तुमच्या सजावटीशी जुळत असल्यास तुम्ही वापरू शकता.

Ganpati Decoration Ideas Old Showcase Items

आपल्याला लेख आवडला असल्यास कृपया खाली त्याबद्दल एक कमेंट लिहावी. धन्यवाद.Ganpati.TV Team

Ganpati.TV Team

The team works hard to provide you useful information. Team also manages all content submitted by our users. If you like, please take a minute to share it on Social Networks.Leave Comments

Write a comment


Best Home Ganpati Decoration Contest 2019

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

5 out of 5
Rating: 5 / 5 - 1 Votes

This year, Ganesh Chaturthi is just a few days away and that leaves you with very less time to think of a new theme. You have already done and dusted few themes so many times that you have lost count. That straw hut concept was fine last year, and the year before that you had done the theme of recreating a scene of a park in your home for Lord Vigna Vinayaka!...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

In a few days, we shall be celebrating Ganesh Chaturthi festival. The festival literally marks the beginning of many other festivals like Navratri and Deepawali in this part of the year. Therefore, Ganpati Puja is one of the most important festivals in the country...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

Nowadays, every one looks for more ideas for theme based Ganpati decoration. Let us have a look at the second part of Top Twenty Ganpati Decoration Ideas that you may try this year at your home. Ideas below will help you to get more ideas and come up with unique theme of your own. Here are the Ganpati Decoration Theme based ideas for home Part 2...

Read More

Get Decoration Contest Details in Email

भारतातील सर्वात मोठी गणपती घरगुती सजावट स्पर्धा
For Ganpati Decoration Contest Email to us at contest@ganpati.tv

Please note: We do not share this information with anyone. We manage it all, ourselves.

Get Contest Details in Email

Ganpati Decoration Contest Email Pictures to us at contest@ganpati.tv
भारतातील सर्वात मोठी गणपती घरगुती सजावट स्पर्धा

Please note: We do not share this information with anyone. We manage it all, ourselves.