Ganpati.TV Contest 2017 Results

आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीसाठी 10 साध्या कल्पना – भाग 1







प्रत्येक वर्षी आपण गणेश चतुर्थी हा सण साजरा करतो आणि आपल्या घरी गणपती ची मूर्ती आणतो. या शुभ दिवशी आपण श्री गणेशाला संतुष्ट करण्यासाठी आपले घर वेगवेगळ्या कल्पना वापरून सजवतो जेणेकरून घर सुंदर, रंगीत दिसेल आणि वातावरण आनंददायी असेल.

आपण सगळेच गणपती उत्सवात घर सजवण्यासाठी वेगवेगळ्या कल्पना शोधत असतो. कधी कधी आपण सहजपणे उपलब्ध असलेले पर्याय खरेदी करतो आणि कधी कधी आपल्याला नवीन निर्मिती व आपल्या मनाप्रमाणे काहीतरी वेगळी सजावट करावीशी वाटते. घरीच सजावट करण्याच्या बऱ्याच कल्पना आहेत पण जेव्हा आपल्याला त्यांची खरच गरज असते तेव्हा त्या आठवत नाहीत.

तुम्हाला सजवटीसाठी कही कल्पना देण्याचा आमचा प्रयत्न आहे ज्यांचा वापर करून तुम्ही सजावटीचा शुभारंभ करू शकता. खाली आम्ही काही कल्पनांचा उल्लेख केलेला आहे ज्या तुम्हाला प्रारंभ करण्यासाठी मदत करू शकतात. या सजावटी तुम्ही सहजरीत्या, कमी खर्चात आणि कमी वेळात करू शकता.

1. विविध माप आणि आकारांचे थर्माकोल शीट्स आणि खांब वापरा

टीप: आम्ही सर्वांना आग्रह करतो की थर्माकोल चा वापर करू नये कारण तो पर्यावरनणास हानीकारक असतो. शक्य असेल तर ईको-फ्रेंडली (पर्यावरण स्नेही) साहित्य वापरण्याचा प्रयत्न करावा.

थर्माकोल शीट्स अतिशय लोक-प्रिय आहेत आणि गणपती सजावटीसाठीची लहान मंदिरे किंवा मंडप तयार करण्यासाठी सर्वात जास्त वापरली जातात. ते विविध माप आणि आकारांत उपलब्ध असतात. त्यांचा उपयोग सजावटीच्या भिंती किंवा त्या भिंतींना उभे धरणाऱ्या स्तंभांसाठी होतो. तुम्हाला वेळेचा अभाव असल्यास, अनेक स्थानिक दुकानांमध्ये आधीच तयार केलेली मंदिरे मिळतात जी अतिशय सुंदर आणि कलात्मक रचनांनी बनविलेली असतात. त्यामुळे तुम्ही खूप वेळ आणि कधी कधी खूप पैसेही वाचवू शकता.

गणपती सजावट कल्पना मंडप थर्माकोलगणपती सजावट कल्पना थर्माकोल शीट्स

2. वाटर कलर किंवा फॅब्रिक कलर मधे भिजविलेले थर्माकोल बॉल्स वापरा

थर्माकोल बॉल्स मुळे सजावटीला एका नवीन निर्मितीचे रूप मिळते, विशेषतः जर तुम्ही तुमच्या घरी एखादी भव्य सजावटीची थीम करण्याचे नियोजन करत असाल. ते सहसा वेगवेगळ्या रंगांमधे मिळतात, नाहीतर एका बाउल मधे वाटर कलर किंवा फॅब्रिक कलर घेऊन त्यात थर्माकोल बॉल्स भिजवून वृत्तपत्र किंवा कोणत्याही फ्लॅट बेस वर त्यांना वाळू द्यावे. त्यांना वापरण्यासाठी भिंतीवर किंवा जिथे तुम्हाला थर्माकोल बॉल्स लावण्याची इच्छा असेल तिथे ग्लू लावून मूठभर बॉल्स त्यावर चिकटविण्याचा प्रयत्न करा.

या रंगीत बॉल्सचा वापर डिझाइन किंवा रांगोळीसाठी पण करता येऊ शकतो, जोपर्यंत तुम्ही त्यांना व्यवस्थित ग्लू करता नाहीतर ते सर्वत्र उड़तात.

गणपती सजावट कल्पना थर्माकोल बॉल्सगणपती सजावट कल्पना थर्माकोल बॉल्स रांगोळी

3. स्प्रे पेंट सजावटी साठी स्प्रे बॉटल्स वापरा

तुम्ही थर्माकोल शीट्स वापरून स्वत: मंडप बनविण्याची योजना आखत असाल, तर तुम्ही विविध रंगांनी भरलेल्या स्प्रे बॉटल्स वापरू शकता. त्याने थर्माकोल शीट्सवर निरनिराळ्या छटा असणारा एक छान इफ़ेक्ट दिसेल. जर तुमचे सजावटीचे बजेट कमी असेल, तर सुंदर मंडप सजावट करण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे.

या बाटल्या सहज उपलब्ध आहेत आणि थोडासा जाड रंग व पाणी यांच्या मिश्रणाबरोबर थर्माकोल शीट्स आणि खांबांवर स्प्रे करायला वापरल्या जाऊ शकतात.

गणपती सजावट कल्पना रंगांची स्प्रे पेंटगणपती सजावट मंडप कल्पना रंगांची थर्माकोल

4. डेकोरेटिव रीबंस, लेसेस आणि बॉर्डर्स

तुमच्या जवळच्या स्टेशनरी दुकानात तात्काळ उपलब्ध असल्याने, या रीबंस आणि लेसेस विविध प्रकारे, अनेक गोष्टी बनविण्याकरीता वापरल्या जाऊ शकतात. त्या विविध रंगात उपलब्ध असतात आणि चमकदार,ग्लिटरी व वेगवेगळे थर असलेले प्रकार सुद्धा मिळतात.

बॉर्डर्स डेकोरेट करण्यासाठी हे वापरले जाऊ शकतात किंवा छान फिनिश देण्याकरीता मंडप च्या खांबांभोवती लावता येतात. आरती थाळी च्या बॉर्डर्स डेकोरेट करण्यासाठी ह्यांचा वापर केला जाऊ शकतो, ज्यामुळे आरती थाळी छान रंगीत दिसते.

गणपती सजावट कल्पना डेकोरेटिव रीबंस, लेसेस आणि बॉर्डर्सगणपती सजावट कल्पना मंडप डेकोरेटिव रीबंस, लेसेस आणि बॉर्डर्स
गणपती सजावट कल्पना रीबंस डेकोरेटिव

5.आरती (पूजे) साठी सुशोभित थाळी

अनेक जण सजावट आणखी रंगीत करण्यासाठी आणि मंडपामध्ये सजावट शैली जुळण्यासाठी विविध प्रकारे आरती थाळी सुशोभित करतात.

आरती थाळी सुशोभित करण्याचे भरपूर पर्याय आहेत आणि तुम्ही किती क्रिएटिव असू शकता याला काही सीमा नाहीये. तुम्ही सर्व प्रकारची फुलं, रंग, थर्माकोल बॉल्स, तांदूळ, आणि इतर रंगीत गोष्टी वापरू शकता.

गणपती सजावट कल्पना आरती (पूजे) साठी सुशोभित थाळी सजावट

गणपती सजावट आरती (पूजे) साठी सुशोभित थाळी सजावट कल्पना

आपल्याला लेख आवडला असल्यास कृपया खाली त्याबद्दल एक कमेंट लिहावी. धन्यवाद.

आम्ही लवकरच ‘आपल्या घरातील गणपतीच्या सजावटीसाठी 10 साध्या कल्पना – भाग 2 (5 कल्पना) अपडेट करू.



Ganpati.TV Team

Ganpati.TV Team

The team works hard to provide you useful information. Team also manages all content submitted by our users. If you like, please take a minute to share it on Social Networks.



Leave Comments

Write a comment


Best Home Ganpati Decoration Contest 2017

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

5 out of 5
Rating: 5 / 5 - 1 Votes

This year, Ganesh Chaturthi is just a few days away and that leaves you with very less time to think of a new theme. You have already done and dusted few themes so many times that you have lost count. That straw hut concept was fine last year, and the year before that you had done the theme of recreating a scene of a park in your home for Lord Vigna Vinayaka!...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

In a few days, we shall be celebrating Ganesh Chaturthi festival. The festival literally marks the beginning of many other festivals like Navratri and Deepawali in this part of the year. Therefore, Ganpati Puja is one of the most important festivals in the country...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

Nowadays, every one looks for more ideas for theme based Ganpati decoration. Let us have a look at the second part of Top Twenty Ganpati Decoration Ideas that you may try this year at your home. Ideas below will help you to get more ideas and come up with unique theme of your own. Here are the Ganpati Decoration Theme based ideas for home Part 2...

Read More

Get Decoration Ideas & Contest Details in Email

ई-मेल मध्ये गणपती सजावट कल्पना मिळवा
ईमेल में गणपति की सजावट आईडियास को प्राप्त करें
તમારા ઇમેઇલમા ગણપતિ આઇડીઅસ પ્રાપ્ત કરો
For Ganpati Decoration Contest Email to us at contest@ganpati.tv

Please note: We do not share this information with anyone. We manage it all, ourselves.

Get Contest Details & Decoration Ideas in Email

Ganpati Decoration Contest Email Pictures to us at contest@ganpati.tv
भारतातील सर्वात मोठी गणपती घरगुती सजावट स्पर्धा

Please note: We do not share this information with anyone. We manage it all, ourselves.