Ganpati.TV Contest 2023 Winners
[signinlocker id="6628"]

या वर्षी गणेश चतुर्थीला पोकेमॉंन गो ला भेटा







Read this article in English

या वर्षी गणेश चतुर्थीला थोडेच दिवस राहिले आहेत आणि त्यामुळे तुम्हाला नवीन थीमचा विचार करण्यासाठी खूप कमी दिवस आहेत. तुम्ही काही थीम्स इतक्या वेळा वापरल्या आहेत की आता तुम्ही मोजणं सोडून दिले आहे. मागच्या वर्षीची पेंढा झोपडी छान होती आणि त्याच्या आधीच्या वर्षी तुम्ही प्रभु विघ्न विनायकासाठी तुमच्या घरात एका बागेचा देखावा बनविला होता!

पण या वर्षी तुमचा मुलगा, मुलगी, भाची किंवा कुटुंबातील इतर कोणतीही व्यक्ती त्यांच्या एंड्राइड किंवा आयफोन मधे पोकेमॉंन गो खेळण्यात खूप वेळ घालवत असतील तर, पोकेमॉंन गो चीच थीम का बनवू नये?

“गोत्ता कैच’एम् आल” वेड:

पोकेमॉंन गो चे वेड विश्वव्यापी झाले आहे आणि ते तुम्ही दुर्लक्ष करू शकत नाही. तुमच्या घरातील गणपती बाप्पांसाठी पोकेमॉंन गो च्या थीमचा मंडप बनविण्याचा प्रयत्न करा!

तुम्ही एका मोठ्या कार्डबोर्डला पोकेबॉलच्या आकारात कापून मागील बाजूस भिंतीला टेकून ठेवू शकता. त्याला लाल आणि पांढरा रंगवा आणि बाप्पांचे आसन त्याच्यासमोर मांडा. तुम्हाला जमले तर प्ले-दो वापरून लहान लहान पोकेमॉंन प्राणी बनविण्याचा प्रयत्न करा किंवा फक्त प्रिंट घ्या आणि बारीक बारीक कापून त्यांना बाप्पाजवळ त्याच्या आसनासमोर चिकटवा. आपल्या घरात गणपती बसविण्यासाठी हि सर्वात सोपी आणि कामी त्रासदायक पद्धत आहे.

पिकाचु, ज़िग्गलीपुफफ, चरमंदिर, बुलबासौर आणि मेऊथ ह्या गोंडस पोकेमॉंनसचा मोठ्या पोस्टरच्या आकारात प्रिंट घ्या जेणेकरून ते तुम्ही मंडपाच्या आसपास उभे करू शकता. हि थीम मुले तसेच पोकेमॉंन गो खेळाचे वेड असलेले प्रौढ यांना दोघांना आवडेल याची खात्री आहे.

अधिक काय विचारायचे?

तुम्ही खरच ही थीम वापरणार असाल तर, लाल आणि पांढरे लाडू प्रसाद म्हणून बनवा जेणेकरून ते पोकेबॉल्स सारखे दिसतील.

तुम्ही प्लास्टिकचे लहान पिंगपाँग चेंडू घेऊन त्यांना लाल, पांढरे आणि मधे एक काळी रेघ असे रंगवून छतापासून सोडू शकता जेणेकरून ते तोरणासारखे दिसतील.

तुम्ही पेपरने बनविलेले पोकेमॉंन प्राणी सुद्धा ठेवू शकता आणि घरात येणारी मुले अथवा प्रौढांना व्यस्त ठेवण्याकरिता लाइव पोकेमॉंन गो खेळू शकता. असे खेळ संध्याकाळी आनंददायक वाटतात जेव्हा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने घरातील उत्सव आणि पूजेनंतर मुले आणि प्रौढ थकलेले असतात.

मग आता तुम्हाला या वर्षासाठीच्या सजावटीची आणि पोकेमॉंन थीमच्या तयारी ची कल्पना मिळाली आहे तर या वर्षी तुमच्या घरातील बाप्पासाठी गूगल वर प्रतिमा शोधा, स्टेशनरी खरेदी करा आणि आपल्या स्वत:च्या पोकेमॉंन खेळाचे मैदान सजवा! अखेर गणेशालाही मुलांशी खेळायला आवडतच!



Ganpati.TV Team

Ganpati.TV Team

The team works hard to provide you useful information. Team also manages all content submitted by our users. If you like, please take a minute to share it on Social Networks.



[/signinlocker]

Leave Comments

Write a comment


Best Home Ganpati Decoration Contest 2022

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

Ganesh Chaturthi Meets Pokemon Go Ganpati Decoration this Year!

5 out of 5
Rating: 5 / 5 - 1 Votes

This year, Ganesh Chaturthi is just a few days away and that leaves you with very less time to think of a new theme. You have already done and dusted few themes so many times that you have lost count. That straw hut concept was fine last year, and the year before that you had done the theme of recreating a scene of a park in your home for Lord Vigna Vinayaka!...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 1

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

In a few days, we shall be celebrating Ganesh Chaturthi festival. The festival literally marks the beginning of many other festivals like Navratri and Deepawali in this part of the year. Therefore, Ganpati Puja is one of the most important festivals in the country...

Read More
Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

Theme based 20 Ganpati Home Decoration Ideas – Part 2

4.0 out of 5
Rating: 4.0 / 5 - 1 Votes

Nowadays, every one looks for more ideas for theme based Ganpati decoration. Let us have a look at the second part of Top Twenty Ganpati Decoration Ideas that you may try this year at your home. Ideas below will help you to get more ideas and come up with unique theme of your own. Here are the Ganpati Decoration Theme based ideas for home Part 2...

Read More